अर्थ : वाहन इत्यादींवर चढणे.
उदाहरणे :
तो घोड्यावर आरूढ झाला.
समानार्थी : आरूढणे, वर चढणे, वर बसणे, स्वार होणे
अर्थ : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.
उदाहरणे :
शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.
समानार्थी : लागणे
अर्थ : एखादी गोष्ट दुसरीच्या पृष्ठभागावर व्यवस्थित बसणे.
उदाहरणे :
दागिन्यांवर सोन्याचे पाणी चांगले चढले.
अर्थ : वर असलेल्या ठिकाणावर जाणे.
उदाहरणे :
ती चौथर्यावर चढली.
अर्थ : आवाज तीव्र होणे.
उदाहरणे :
त्या गायिकेचा आवाज सहज चढतो.
अर्थ : गर्वाने ताठणे.
उदाहरणे :
नोकरी लागल्यापासून तो फार चढला.
अर्थ : पातळी वाढणे.
उदाहरणे :
त्या विहिरीस पाणी चढले.
अर्थ : देव, देवता इत्यादीस भेट म्हणून मिळणे.
उदाहरणे :
कालीमातेच्या मंदिरात खूप वस्तू चढल्या.
चढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadhne samanarthi shabd in Marathi.